धामणी आर. जी. काते विद्यामंदिरचे २१ रोजी स्नेहसंमेलन

 
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील धामणी पंचक्रोशी येथील श्रीमान आर. जी. काते विद्यामंदिरात २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्नेहसंमेलनासह पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन अजय बिरवटकर यांच्याहस्ते उद्घाटन होईल. याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य अंकुश काते, सखाराम कदम, हरिश्चंद्र खताते, सुधीर कदम, सरपंच शितल शिंदे (धामणी), राजश्री घाडगे (घेरापालगड), संदेश मोहिते (पोयनार), उर्मिला भिलारे (भिलारे आयनी), अमृता धाडवे (साखरोली), माजी विद्यार्थी संघटनेचे ग्रामीण अध्यक्ष विनोद गोगावले, मुंबई अध्यक्ष संदीप बिरवटकर आदी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका बांद्रे यांनी केले आहे.