केस न्यायालयात सुटण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता सापडला 

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाची चिपळूण येथे कारवाई 

रत्नागिरी : खेड येथील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून काम क्रणाऱ्याला वकिलाला दीड लाख रुपये लाच म्हणून स्वीकारताना रत्नागिरीच्या लाच लुचपत विभागाने गुरुवारी संध्याकाळी रंगेहाथ पकडले आहे.

 

शुक्रवारी दिलेल्या प्रेस नोट नुसार राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी यांना तक्रारदार यांचेकडुन लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले.

श्री. राजेश देवराव जाधव यांनी

यातील तक्रारदार यांच्या घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकील पत्र घेतलेले आहे. सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस राजेश जाधव हे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून पाहत होते. दिनांक २६/१२/२०२४ व दिनांक ०३/०१/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल असे प्रयत्न करेन, जास्त सरतपास न घेता महत्वाचे मुदद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,०००/- रुपयांची मागणी केली होती आणि त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन १,५०,०००/- रू. स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यानंतर दिनांक ०९/०१/२०२५ रोजी सापळ्याचे आयोजन करुन लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांचेकडुन १,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना ओयासीस हॉटेल, चिपळूण येथे दिनांक ०९/०१/२०२५ रोजी १९.१७ वाजता रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.

 

ही कारवाई अविनाश पाटील, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली