राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी

कोल्हापुरातील विविध पक्ष, परिवर्तनवादी संघटनांतर्फे राजमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन.

प्रतिनिधी/ रोहन कांबळे :कोल्हापूर: दुधाळी परिसरातील के.एम.सी. कॉलेज समोरील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास विविध परिवर्तनवादी पक्ष, संस्थांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेण्यात आली.

याप्रसंगी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना देऊन चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्वाभिमानी विचार रुजवण्याचे महान कार्य राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केले आहे. राजमाता जिजाऊंचे महान कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे असे विचार अनिल चव्हाण यांनी मांडले. याप्रसंगी लोकराज्य जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पी.के.पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाडगे, राजमाता तरुण मंडळाचे अध्यक्ष धनाजी आमते, राहुल केर्लेकर, शिवाजी नलवडे, युवराज पाटील, सचिन केर्लेकर, करण लाड, सौरभ आमते, संतोष लाड, राज कुरणे, कुमार जारकोळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुलांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.