उलाढाल जेवढी मोठी तेवढी बँक मोठी – माजी खासदार निलेश राणे सिंधुदुर्ग बँक चौके शाखा ‘एटीएम’चा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकर्पन
चौके | वार्ताहर : चौके गावात गेली अनेक वर्षे सिंधूंदूर्ग जिल्हा बँकेच्या माद्यमातून एटीएमची मागणी वारंवार होत होती.याबाबत माजी खासदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधले गेले होते राणेसाहेबांनी तत्परता दाखवत चौके गावात एटीएम व्हायला हवे असे बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी याना सांगितले होते आणि आज हे चौके वाशींयाचे एटीएम चे स्वप्न पूर्ण झाले आहे.यापुढे आपली ही जिल्हा बँक राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अने उपक्रम राबविण्यास सज्ज असून मनिष दळवी सारखे गतिमान अध्यक्ष लाभले असून संचालक मंडळही चांगले कार्यरत आहे.बँक देशांत नंबर येण्यासाठी काम करणारी टीम कार्यरत आहे असे माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चौके शाखा येथील ४० व्या एटीएम मशीनचा लोकार्पन सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
यावेळी बँक संचालक व्हिक्टर डांटस, संचालक संदीप (बाबा) परब, संचालक मेघनाद धुरी,भाजपचे अशोक सावंत,धोंडी चिंदरकर,बँक कार्यकारी अधिकारी प्रमोद सावंत,सुरेश चौकेकर,राजन गावडे,संतोष गावडे,कृ.बा.करलकर,नंदू राणे,विष्णू गावडे,जिल्हा बँकचे राजेंद्र केरकर, देवानंद लोकेगावकर,पी.टी.सरमळकर,सुरज गवंडी,संजय पाताडे,स्वप्निल केळूसकर,महेश तेरसे,पी.टी.सामंत,शरद सावंत,जयेश लाड,सावंत मंडम तसेच कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
या एटीएम लोकार्पन सोहळ्याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी चौके येथील हे एटीएम होण्यामागे माजी खासदार निलेश राणे यांची सुचना होती.त्यामुळे या एटीएम मशीनचे सर्व श्रेय त्यांचेच आहेअसे सांगत बँकेच्या नवनवीन उपक्रमांची सविस्तर माहिती देत जिल्हा बँक ही सर्वसामान्यांची बँक आहे असे सांगितले. यावेळी संदिप(बाबा)परब यांनीही थोडक्यात मार्गदर्शन केले.या लोकार्पन प्रसंगी माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते या बँक कार्यालय जागा मालक विष्णू गावडे यांच्या सत्कार करण्यात आला.बँकेच्या वतीने उपस्थित खरेदी विक्री संघांचे संचालक सुरेश चौकेकर,चौके माजी सरपंच राजा गावडे,नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण ,पचायत समिती सदस्या मनिषा वराडकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे,व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदू राणे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच एटीएम कार्ड चे वाटप करण्यात आले.











