सावंतवाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची संयुक्त कारवाई
सावंतवाडी । प्रतिनिधी : कारिवडे गोसावीवाडी परिसरातील मराड जंगलमय भागात सुरू असलेल्या अनधिकृत जुगारावर धाड टाकत पोलिसांनी १९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सावंतवाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
या कारवाईत संशयित प्रकाश रघुनाथ नार्वेकर ( सालईवाडा, सावंतवाडी ), अनिल सुमन नाईक ( झिरंगवाडा, सावंतवाडी ) , राजन गणपत देसाई ( माठेवाडा सावंतवाडी ) अनिल मारुती धोत्रे ( कारिवडे ) प्रणव कृष्णा परब ( कारिवडे ) महेश्वर धनंजय मुळीक ( ओटवणे ) व कृष्णा धोंडीबा गोसावी ( विलवडे तालुका सावंतवाडी ) यांना ताब्यात घेण्यात आले.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर सावंत, प्रकाश कदम, गुरुनाथ कोयंडे, डॉमनिक डिसोजा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोजा तसेच कारिवडे बीट अंमलदार संतोष गलोले यांनी ही कारवाई केली. याबाबतची माहिती बीट अंमलदार संतोष गलोले यांनी दिली आहे.











