रत्नागिरी ः प्रतिनिधी
रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची बॅग लांबवून सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल चोरला. चोरीची ही घटना 30 डिसेंबर रोजी सकाळी 7.45 वा. सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशला घडली आहे.
याबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 30 डिसेंबर 2024 रोजी करमाळी विंटर स्पेशल रेल्वेने ठाणे ते गोवा असा प्रवास करत होते. त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टशनजवळ आली असता अज्ञाताने त्यांची बॅग चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगमध्ये 35 हजार किंमतीचे दोन मोबाईल, रोख 7 हजार रुपये आणि लेडीज पर्स व इतर साहित्य 18 हजार रुपये असा एकूण 60 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











