राजापूर | प्रतिनिधी : जिल्हा नियोजन अंतर्गत माजी केंद्रीयमंत्री आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांच्या शिफारसीने सुमारे १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेल्या ओणी, अणूस्कुरा मुख्य रस्ता ते रायपाटण, पाळेकरवाडी या रस्त्याचे भुमीपूजन भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जब्बार काझी यांच्या हस्ते रविवारी १६ फेब्रुवारी करण्यात आले. याप्रसंगी रायपाटण गावचे सरपंच निलेश चांदे, उपसरपंच विजय जड्यार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रायपाटण, पालेकरवाडी येथील खराब बनलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती साठी प्रयत्न सुरु होते. माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. स्वतः खासदार राणे यांनी लक्ष दिले आणि जिल्हा नियोजन अंतर्गत निधी उपलब्ध व्हावा म्हणून शिफारस दिली होती. त्यानुसार सदर कामासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत १५ लाख रुपये मंजूर झाले. त्याचा भुमीपूजन सोहळा रविवारी पार पडला.त्यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.जब्बार काझी, भाजप राजापूर युवा मोर्चा शहर अध्यक्ष राजेश खानविलकर, रायपाटणचे सरपंच निलेश चांदे,उपसरपंच विजय जड्यार,राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश पराडकर,बूथ अध्याय प्रसाद देसाई युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाताडे मनोज गांगण मंगेश पराडकर ग्रामस्थ अप्पा पाळेकर आणि गावं आणि मुंबईस्थित ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या रस्त्याचा विषय मार्गी लागल्याने समस्त पाळेकरवाडीतील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.











