भरणे च्या शामराव पतपेढीतील साडेचार कोटींच्या ठेवी अडचणीत ?

खेड(प्रतिनिधी) भरणे येथील शामराव सहकारी पतसंस्थेच्या सभासदांच्या ठेवी अडचणीत आल्या असून हा आकडा अंदाजे साडेचार कोटींच्या घरात जात आहे. त्या मुळे या ठेवी सद्य स्थितीत अडचणीत आहेत

या बाबत सहाय्यक निबंधक सुनील मोरे यांच्या शी संपर्क साधला असता या पतसंस्थेच्या आपल्या ठेवीची रक्कम परत मिळत नाही म्हणून सर्वप्रथम ५ सप्टेंबर २०२४ रोजी येथील सहाय्यक तक्रार दाखल करण्यात आली.होती त्यानंतर सहकारी संस्था खेड यांच्याकडे तक्रारींचा ओघ वाढत चालला. त्यानंतर मात्र शामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली.असल्याचे मोरे यांनी सांगितले

या तक्रारीच्या अनुषंगाने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा उपनिबंध रत्नागिरी कार्यालयात संस्थेच्या अडचणी बाबत बैठक ही पार पडली त्यानंतर १३ नोव्हेंबर २०२४ रोजी शासकीय लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यात यावी असेही ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे या पतपेढीच्या लेखापरीक्षणासाठी रत्नागिरी येथील ब वर्ग शासकीय लेखा परिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप लेखापरीक्षण झालेले नसल्याने नेमके किती ठेवीदार आर्थिक अडचणीत आहेत हे कळू शकले नसले तरी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची बाब पुढे येत आहे.