सावंतवाडी :
गुढीपाडवा व रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी सावंतवाडी पोलिसांकडून शहर व परिसरात संचलन करण्यात आले. सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संचलन करण्यात आले.









