सावंतवाडी । प्रतिनिधी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळेचा बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात प्रथम गौरवी अंकुश दाभोलकर -81.67 टक्के द्वितीय-संजना सुरेश गावडे -81.50 टक्के, तृतीय-जान्हवी गणेश सोन्सूरकर 80.67 टक्के ठरली आहे.
बारावी कला शाखेचा निकाल 92.30 टक्के लागला असून यात प्रथम-संध्या मोहन राऊळ-87.17 टक्के, द्वितीय-सानिया संदीप राऊळ-68.50 टक्के,तृतीय-प्रज्ञा श्रीराम गवंडी-55.17 टक्के पटकाविला आहे. सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन मुख्याध्यापक सौ कल्पना बोवलेकर , संस्थाध्यक्ष आ. भि. राऊळ व प्रशालेच्यावतीन करण्यात आले आहे.











