2 महाविद्यालयांचा निकाल 100टक्के
दापोली | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल (HSC Results) नुकताच जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे.
दापोली तालुक्यातून 1605 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 1602 विद्यार्थी परीक्षेला बसले. यामध्ये 1419 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा 88.57 टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील एकूण 16 महाविद्यालयांपैकी न्यु इंग्लिश स्कुल आणि जुनियर काँलेज, टाळसुरे आणि एस.मेहता काँमर्स जुनियर काँलेज, दापोली या 02 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
दापोली तालुक्यामध्ये 66 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य,249 प्रथम श्रेणी, 774 व्दितीय श्रेणी, 330 तृतीय श्रेणी प्राप्त केली आहे.
तालुक्यातील महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे- एन.के.वराडकर आणि आर.व्ही बोलोसे महाविद्यालयातून 332 विद्याथ्र्यांपैकी 278 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 83.98 टक्के निकाल लागला आहे., ए.जी.हायस्कूल, दापोली 452 पैकी 398 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 88.05 टक्के निकाल, डि.पी.दांडेकर काँलेज केळशी 68 विद्याथ्यांपैकी 61 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 89.70 टक्के निकाल, द रायसिंग हायस्कूल, जामगे 09 विद्याथ्यांपैकी 08 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 88.88 टक्के निकाल, व्हि.आर.घोले जुनियर काँलेज, वाकवली 88 विद्याथ्यांपैकी 65 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 73.86 टक्के निकाल, एस.एम.बुटाला जुनियर काँलेज, गावतळे 44 विद्याथ्यांपैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 95.45 टक्के निकाल, वेळवी पंचक्रोशी हायस्कूल, वेळवी 27 विद्याथ्यांपैकी 21 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 84.00 टक्के निकाल,
नँशनल हायस्कूल, दापोली 222 विद्याथ्यांपैकी 211 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 95.04 टक्के निकाल, रामराजे काँलेज, दापोली 131 विद्याथ्यांपैकी 121 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 92.36 टक्के निकाल, एस.मेहता काँमर्स जुनियर काँलेज, दापोली 27 विद्याथ्यांपैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल, जुनियर काँलेज आर्टस काँमर्स हर्णे 35 विद्याथ्यांपैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 88.57 टक्के निकाल, सानेगुरुजी आर्टस, काँमर्स, सायन्स काँलेज, पालगड 48 विद्याथ्यांपैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 93.75 टक्के निकाल, लोकमान्य टिळक विद्यामंदिर आणि जुनियर काँलेज, चिखलगांव 60 विद्याथ्यांपैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 90.00 टक्के निकाल,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर काँलेज, जालगांव 18 विद्याथ्यांपैकी 15 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 88.23 टक्के निकाल
न्यु इंग्लिश स्कुल आणि जुनियर काँलेज, टाळसुरे 33 विद्याथ्यांपैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल, ए.जी.हायस्कूल, दापोली 12 विद्याथ्यांपैकी 09 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 75 टक्के निकाल लागला आहे.











