अमित खोत | मालवण : श्रीराम मंदिर एसटी स्टँड नजिक भरड मालवण येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ह.भ.प. श्री. अक्षय सखाराम सातार्डेकर यांनी राम जन्म अख्यान सादर केले. त्यांना श्री. वैभव दिलीप मांजरेकर यांची तबला साथ लाभली.
यावेळी श्री राम मंदिर गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ मालवण ट्रस्ट पदाधिकारी अध्यक्ष प्रभाकर देऊलकर यांसह सचिव अक्षय सामंत, अशोक ओटवणेकर, खजिनदार महेश परुळेकर, सहसचिव अभिषेक कांदळकर, धनेश हडकर, सदस्य मंजित नार्वेकर, दिनेश किडये यांसह माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाबू कांदळकर, संतोषी कांदळकर, उत्सुक गावकर, दिव्या पाटकर, महेश गांवकर, ललित चव्हाण, शुभम लुडबे, अर्जुन चव्हाण, महेश दाभोलकर, माधुरी दाभोलकर, नागेश कांदळकर, मंजित नार्वेकर, प्रकाश कासले, नागेश कांदळकर, रश्मी तुळसकर, सुरेखा हडकर, प्रांजल कवठकर, मधुरा तुळसकर, रविना मोंडकर, अर्चना हडकर, नम्रता कांदळकर, अनिता सुतार, लक्ष्मी वरक, संगीता गावकर, स्मिता इब्रामपुरकर, कविता मोंडकर, बाबू हडकर, रुपेश हडकर, राकेश बगाड, संभाजी नार्वेकर, सचिन नार्वेकर, निखिल आरोंदेकर, अर्चना मिठबावकर, रुचिता हडकर, संदेश चव्हाण, प्रसन्न तुळसकर, निखिल बगाड यांसह नागरिक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.












