गुहागर प्रतिनिधी:
सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या तालुक्यातील तळवली गावातील गुरुकृपा सामाजिक मंडळ शिगवणवाडीतर्फे यावर्षी 30 व 1 मे असे दोन दिवस सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये गुरवार दि. 30 एप्रिल व शुक्रवार दि. 1 मे रोजी दोन दिवशीय विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाला मुंबई व गावातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. यावेळी माहेर वाशिनींचा सन्मान करण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक 30 रोजी सकाळी 8 ते 8.30 पर्यंत सुवर्णमहोत्सवी ज्योत आगमन व दिंडी मिरवणूक, सकाळी 8.30 ते 9 पर्यंत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम उद्घाटन, सकाळी 9 ते 9.30 पर्यंत चहा व नाष्टा – अल्पोपहार, सकाळी 9.30 ते 12.30 पर्यंत महाआरोग्य शिबिर प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने, दुपारी 1 ते 2.30 पर्यंत स्नेह भोजन, सायं. 4 ते 6 पर्यंत सोहळा सख्यांचा… सन्मान लेकींचा, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग: रत्नागिरी केंद्र गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने खेळ पैठणीचा, सायं. 6 ते 6.18 पर्यंत चहा व अल्पोपहार, सायं. 6.15 ते 7.30 पर्यंत वाडीतील सदस्यांचा सन्मान सोहळा, रात्रौ 9.30 ते 12 मनोरंजनात्मक खेळ, स्थानिक सर्व ग्रामस्थ खेळ खेळूया पैठणीचा…स्त्रियांच्या सन्मानाचा तसेच शुक्रवार दिनांक 1 मे सकाळी 8 वाजता गुरुकृपा सामाजिक मंडळ शिगवणवाडी एस.टी. स्टॉप बोर्ड उद्घाटन, सकाळी 8.30 ते 9.30 पर्यंत अल्पोपहार, सकाळी 9.30 ते 11.30 पर्यंत श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी 11.30 वाजता महाआरती, सकाळी 11.30 ते 12.30 पर्यंत गुरुकृपा महिला मंडळ शिगवणवाडी हळदीकुंकू समारंभ, दुपारी 1 ते 2.30 पर्यंत सार्वजनिक महाप्रसाद, दुपारी 3 ते 4 पर्यंत सुवर्णमहोत्सवी “लकी ड्रॉ” व बक्षिस वितरण, सायं. 4 ते 4.30 सन्मान कर्तृत्वाचा सत्कार यशवंतांचा… प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते सन्मान सोहळा, सायं. 4.30 ते 6 पर्यंत सार्वजनिक महा हळदीकुंकू समारंभ, सायं. 7 वाजता सुश्राव्य भजन – गुरुकृपा मंडळ शिगवणवाडी स्थानिक मंडळी, रात्रौ 10.30 नंतर सांस्कृतिक कार्यक्रम नमन पार पडणार आहे.
या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुरुकृपा सामाजिक मंडळ शिगवणवाडी व महिला मंडळ शिगवणवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.












