सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र खेबुडकर यांची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत लोरे नं1 गावाला भेट…

लोरे गावातील नावीन्यपूर्ण उपक्रम श्री.देव रुजेश्वर उद्यान ला भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले कौतुक

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र खेबुडकर हे महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसीय उपक्रम निमित्ताने सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेट देत असताना आज *संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०२४-२५ तालुकास्तरीय निवड झाल्यानंतर जिल्हास्तरीय मूल्यमापन* करण्यासाठी कणकवली तालुक्यातील लोरे गावाला भेट दिली.गावातील विविध योजनांचा आढावा घेत असताना स्वच्छता,आरोग्य, शिक्षण,पाणी स्त्रोत,कचरा व्यवस्थापन , सांडपाणी व्यवस्थापन, व इतर बाबींवर आढावा घेत चर्चा करून महत्वपूर्ण सूचना केल्या.लोरे गावातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत असताना.उपक्रमांचे कौतुक करत असताना समाधान व्यक्त केले तसेच श्री.देव रुजेश्वर उद्यान ला भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले. व स्मार्ट गाव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले.. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर यांच्या समवेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. ए एम परब,शिक्षणाधिकारी श्री.गणपती कमळकर, गट विकास अधिकारी, श्री.अरुण चव्हाण , विस्तार अधिकारी, श्री. सूर्यकांत वारंग, गटशिक्षणाधिकारी , श्री.गवस, ग्रामपंचायत लोरे चे सरपंच श्री. अजय रावराणे, ग्रामपंचायत अधिकारी,श्री.राकेश गोवळकर , ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग,आदि उपस्थित होते.