माजगाव मामा-भाचा गणपतीचे विसर्जन जल्लोषात

माजगाव | प्रतिनिधी :माजगाव येथील प्रसिद्ध मामा-भाचा गणपतीचे विसर्जन आज भक्तीमय वातावरणात करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

 

गणेश मूर्तीचे विसर्जन माजगाव महादेव मंदिराजवळील तलावात करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक, गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. विसर्जन सोहळा पार पडताना सर्वत्र उत्साहाचे आणि भावनिक वातावरण होते.