Breaking: राई भातगाव मार्गावर गॅस टँकरने घेतला पेट

रत्नागिरी : प्रतिनिधी

भर उन्हात चालती वाहने पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाहतूक धोकादायक झाली आहे. आज बुधवार सकाळी जाकादेवी नजीक राई भातगांव मार्गावर सीएनजी वाहतूक करणारा एक गॅसचा टँकर जळून खाक झाला आहे.

यात कोणती हानी झाली याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही मात्र जयगड पोलीस घटनास्थळी पोहोचत असल्याचे समजत आहे