आमदार निलेश राणे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची घेतली भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ रोपवाटीका केंद्रातील रिक्त पदभरती ; अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना ग्रेड-१ मंजूर सह शासकीय सेवेत सामावून घ्या

कृषी कार्यालयातील रिक्त शिपाई पदांवर अनुभवी कंत्राटी मजुरांना संधी द्यावी : विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी विविध महत्वपूर्ण विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

 

प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ रोपवाटीका केंद्रातील रिक्त पदभरती, अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना ग्रेड-१ मंजूरसह शासकीय सेवेत सामावून घेणे, तसेच कृषी कार्यालयातील रिक्त शिपाई पदांवर अनुभवी कंत्राटी मजुरांना संधी देणे या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा यावेळी झाली.

 

पात्र व गरजू मजुरांच्या उदरनिर्वाहासाठी योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती यावेळी आमदार निलेश राणे यांनी केली. एकूणच आमदार निलेश राणे यांनी मांडलेल्या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.