राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील कळसवली येथील शेतविहीरीत पडलेल्या गवा रेडयाला वनविभागाने ग्रामस्थांचे मदतीने रेस्कु ऑपरेशन राबवत सुरशक्षितरित्या बाहेर काढत जीवनदान दिले आहे.
गुरूवार 8 जून रोजी कळसवली येथे ही घटना घडली. कळसवली येथील रामचंद्र राजाराम शेवडे यांचे शेवडेवाडी येथील विहिरीत गवा हा वन्यप्राणी पडल्याची माहिती शांताराम जनार्दन शेडेकर कळसवली गावचे अमित कृष्णा बाणे यांना दिली. त्यांनी ही माहिती सायंकाळी 5.45 वाजता परिमंडळ वनधिकारी राजापुर सदानंद घाटगे यांना सांगितली. याबाबत घाटगे यांनी परिक्षेत्र वनधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना भ्रमण ध्वनी वरून माहिती दिली.
त्यानंतर वनपाल राजापुर यानी स्थानिक रेस्कुटीम च्या सहाय्याने जागेवर सायं 6.45 वाजता पाहणी केली असता सदरची विहीर ही 20 फूट खोल असुन त्यामध्ये पाण्याची खोली 6 ते 7 फुट आहे. घेरी 20 ते 22 फूट असून विहरीला कटडा नाही. सदरची विहीर नाल्या लगत आहे. सदर विहिरीतील पाणी शेतीसाठी वापर केला जातो. सध्या पाणी वापर होत नाही. विहिरी ची खोली जास्त असल्याने JCB च्या साहाय्याने रॅम्प करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे सायंकाळी 7.30 वाजता JCB आणून त्यांच्या सहाय्याने रस्ता तयार केला व नैसर्गिक रीत्या गवा सुस्थितीत रात्री 7.45 वाजता बाहेर आला. गवा नर असून त्याचे वय साधारण दिड ते दोन वर्षे आहे, सदर वन्यप्राण्यांस कोणतीही इजा अथवा जखम झाली नाही , गवा नैसर्गिक अधिवासात सुस्थितीत निघून गेल्याची माहिती वनविभागाचे वतीने देण्यात आली आह.
ही कार्यवाही विभागीय वनाधिकारी रत्नागिरी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार, सदानंद घाटगे वनपाल राजापूर, विक्रम कुंभार, वनरक्षक, हरिश्चंद्र गुरव वनमजुर, गणेश गुरव, विजय म्हादे , दिपक म्हादे, नितीन बाणे , सरपंच कळसवली देवेश तळेकर यांनी रेस्कु साठी सहकार्य केले.
वन्यप्राणी अडचणी मध्ये आढळून आलेस वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले.
फोटो 9 आरजेपी 1
कळसवली येथे विहीरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे सुरू असलेले प्रयत्न.










