वेंगुर्ले : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक येथे पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अधिकृत संघ पाठवण्यात येणार असून त्यासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी व स्पर्धा रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता एमआयडीसी ग्राउंड, कुडाळ येथे घेण्यात येणार आहे.
सदर निवड प्रक्रियेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व टेनिस क्रिकेट खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव कुणाल हळदणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
निवड चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रेः दोन पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्डची झेरॉक्स प्रत, शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंची जन्मतारीख ०१/०१/२००९ नंतरची असणे आवश्यक आहे.
निवड चाचणी ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच मर्यादित असून, यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंना नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. टेनिस क्रिकेट हा ग्रामीण भागातील तरुणांचा आवडता खेळ बनला आहे. या निवड चाचणीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यपातळीवर चमकण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७६२०९२७४७८ किंवा ७९७२३८२११९ यांच्याशी संपर्क साधावा.










