फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना संधी.
वयोमर्यादा २१ ते ३८.
अर्ज करण्याचे संकेतस्थळ : www.sindhudurgdcc.com
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ५ ते ३० सप्टेंबर.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी
सिंधुदुर्गनगरी l बाळ खडपकर :सेवानिवृत्ती व स्वेच्छा निवृत्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे २५० कर्मचारी पदे रिक्त झाली आहेत. राज्याच्या सहकार विभागाने पहिल्या टप्प्यात बँकेची ७३ लिपिक पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांची कर्मचारी पद भरती करणाऱ्या नामांकित आयबीपीएस कंपनीकडून हे कर्मचारी भरती करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी मिळणार आहे. ९० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे व गुणवत्तेवर निवड होणार आहे. वयोमर्यादा २१ ते ३८.ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ५ ते ३० सप्टेंबर.परीक्षेपूर्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर व बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे गेली अनेक वर्षे बँकेच्या कामकाजावर व ग्राहक सेवेवर परिणाम होत होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे, सहकार मंत्री रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार रिक्त पदे भरण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला. व जिल्ह्यातीलच स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी सरकार स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच स्थानिक उमेदवार घेण्यास विशेष परवानगी मिळाली. त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना होईल. तसेच ही भरती राष्ट्रीयकृत बँकांची पदभरती करणाऱ्या व नामांकित असलेल्या आयबीपीएस कंपनीकडून करावी असा निर्णय संचालक मंडळांनी घेतला. त्यामुळे आयबीपीएस कंपनीकडून बँकिंग क्षेत्राच्या परीक्षेला सामोरे जाण्याची संधी येथील उमेदवारांना मिळेल व गुणवत्ता दाखवणाऱ्या उमेदवारांना यात संधी मिळेल. पूर्ण पारदर्शक व गुणवत्तेवर निवड होणार असल्यामुळे कोणतीही वशिलेबाजी किंवा कोणताही गैरप्रकार या भरतीत होणार नसल्याचे स्पष्ट मत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळशेकर यांनी व्यक्त केले. संचालक मंडळाने पाठविलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या सहकार विभागाने पहिल्या टप्प्यात ७३ पदांच्या लिपिक भरतीस मान्यता मिळाली. व त्यानुसार ही भरती प्रक्रिया होत आहे.
जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी
या भरतीत फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळणार आहे. अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
परीक्षा प्रक्रिया
भरती प्रक्रियेत उमेदवारांचे मूल्यमापन १०० गुणांवर केले जाणार आहे –
९० गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा
१० गुणांची मुलाखत व अनुभव
निकाल जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक प्रशिक्षणही बँकेमार्फत दिले जाणार आहे.
—
दुसरा टप्पा जानेवारीनंतर
पहिल्या टप्प्यातील ७३ पदांनंतर, जानेवारी २०२६ नंतर दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबवली जाईल. या टप्प्यात विविध शाखांसाठी मिळून २५० पेक्षा जास्त पदे भरण्याची माहिती बँकेने दिली.
पारदर्शकतेची हमी
भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी उमेदवारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.
संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत व निष्पक्ष असेल.
गुणवत्तेला व मेरिटला प्राधान्य दिले जाणार आहे. असेही बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बाबी.
अर्ज सादरीकरण : ५ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५
अर्ज करण्याचे संकेतस्थळ : www.sindhudurgdcc.com.
उमेदवारांना सर्व माहिती संकेतस्थळावर मिळेल.
वयोमर्यादा : २१ ते ३८ वर्षे (पूर्वी ३५ होती, वाढवून ३८ केली)
पात्रता : शैक्षणिक योग्यता व अनुभव महत्त्वाचा.
परीक्षा शुल्क पंधराशे रुपये.
परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हापसा पणजी मडगाव हे राहतील.
परीक्षा पद्धत : ९० गुण लेखी परीक्षा + १० गुण मुलाखत/अनुभव
निवडीनंतर : बँकेमार्फत प्रशिक्षणाची सुविधा.
या पत्रकार परिषदेवेळी बँकेचे संचालक गजानन गावडे, दिलीप राव राणे, सौ नीता राणे सौ प्रज्ञा ढवन, गणपत देसाई, प्रकाश मोर्ये, बाबा परब, समीर सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रमोद गावडे, अमोल शिंदे आधी उपस्थित होते.










