बांदा | प्रतिनिधी
फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट होऊन बांदा येथील कावेरी हॉटेलला भीषण आग लागली. आज रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. अशोक वाटिका ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब ही घटनास्थळी दाखल झाला आहे. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागली त्यावेळी हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांसह काही ग्राहकही उपस्थित होते.














