वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुका समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने दि. २ ते ४ जानेवारी या कालावधीत वेंगुर्ला रामेश्वर मंदिर येथे वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
दि. २ जानेवारी रोजी स्वामी शिवानंद आश्रम शेकिन-हासूरचे मठाधिपती ह.भ.प.वेदांतचार्य उदय पाटील (शास्त्री) यांचे कीर्तन, दि. ३ जानेवारी रोजी वासकर फडचे ह.भ.प. आनंदमहाराज जाधव (पंढरपूर) यांचे कीर्तन तर दि. ४ जानेवारी रोजी रायगडभूषण ह.भ.प.शिवम संदेश कदम (रायगड) यांचे कीर्तने होणार आहे. या कीर्तनांना विणेकरी म्हणून ह.भ.प.सावळाराम महाराज कुर्ले (वेंगुर्ला), तसेच ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर, ह.भ.प.धनंजय महाराज ओलेकर, ह.भ.प. सोपानदेव महाराज तावडे, ह.भ.प. सूर्यकांत महाराज जोशी, ह.भ.प.संतोष महाराज रेगडे, ह.भ.प. प्रकाश डिचोलकर, ह.भ.प.त्रिमुर्ती महाराज सातार्डेकर आदी गायनाचार्य म्हणून तर जगदीश महाराज पाटील व यश महाराज मांजरे हे मृदुंगावर साथ देतील. तिन्ही कीर्तन सायंकाळी ६ वाजता सुरू होतील. तरी श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त वेंगुर्ला तालुका वारकरी संप्रदायातर्फे करण्यात आले आहे.







