इनरव्हील क्लब आणि लेडीज डॉक्टर क्रिकेट क्लब तर्फे वेंगुर्ले येथे १० मार्च ला “पिंक पॉवर” विविध खेळ स्पर्धा

 

 

वेंगुर्ले l प्रतिनिधी :इनरव्हील क्लब, वेंगुर्ला आणि लेडीज डॉक्टर क्रिकेट क्लब, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी रविवार दि. १० मार्च रोजी दुपारी २.३० वा. ते सायं. ६.०० वा. या वेळेत वेंगुर्ला कॅम्प, वेंगुर्ला येथे “पिंक पॉवर” विविध खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये लिंबू चमचा, SACK RACE, धावणे १०० मीटर, रस्सीखेच, सूर्यनमस्कार, बॅडमिंटन, दोरी उडी असे विविध खेळ असणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी महिलांनी अधिक माहिती व नाव नोंदणी साठी ९८२३११८७७८, ९४०४४४४२८२ किंवा ९४२०२६५४५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.