लेक वाचवा, लेक शिकवा अंतर्गत शाळा प्रभानवल्ली येरडववाडी आणि पालक, ग्रामस्थ यांचा संयुक्त उपक्रम
लांजा ( प्रतिनिधी) तालुक्यातील प्रभानवल्ली येरडववाडी सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. लेक वाचवा, लेक शिकवा अंतर्गत शाळा प्रभानवल्ली येरडववाडी आणि पालक, ग्रामस्थ यांचा संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या आनंदोत्सवासाठी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. विमल चव्हाण, डि . जे . सामंत कॉलेज पाली प्राचार्या श्रीम. डॉ . कांताजी कांबळे , हर्चे हायस्कूलचे संस्थापक बबनजी मयेकर, सानेगुरुजी विचारमंच लांजाचे अध्यक्ष नाना मानकर, उपाध्यक्ष चंद्रकांत परवडी, आरास अकॅडमी रत्नागिरी चे संस्थापक श्री .सतवे, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड . लांजाचे अध्यक्ष अल्लाउद्दीन नेवरेकर सुधाकर कांबळे (सचिव) सानेगुरुजी विचारमंच . लांजा, शिक्षणप्रेमी बिलाल हकीम, केंद्रप्रमुख संतोष पडवणकर, केंद्रमुख्याध्यापक महेश शेडये आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकवृंद , विद्यार्थी पालक ग्रामस्थ तसेच अंगणवाडी ताई सौ . स्वरा पालांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ
अहिल्यामाई, साऊमाई ,फातिमाई , रमाई, रखुमाई
झलकारीमाई,शांतामाई,मदर तेरेसा,माता बहिणामाई यांच्या क्रांतीची विचारांची, स्वाभिमानाची व
त्यागाचे प्रतिक मानून ज्ञानज्योतीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली . ज्ञानज्योती चे पुष्पपाकळ्यांचा वर्षाव करून विमल चव्हाण, कांबळे , गुलशन शेख ,तब्बसुम हकिम, सनम शेख यांचे हस्ते स्थापित करण्यात आली. मायमाऊलीच्या विचारांचा प्रसार प्रचार दाहीदिशा व्हावा याकरीता विमल चव्हाण यांचे हस्ते आसमंतात फुगे सोडण्यात आले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. रुचिरा माने यांनी केले.यानंतर सर्व प्रमुख मान्यवर व विद्यार्थी ग्रामस्थ व सर्व सहकारी शिक्षक वृंद यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या कुमारी आफ्रीन आरीफ शेख हीचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे निमित्ताने येरडववाडी महिला तसेच विद्यार्थीनी यांचा सामुहीक वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पडवणकर यांनी केले . महिलांनी आपल्या पुढील आव्हाने याबाबत जागरूक राहून प्रत्येक महिलेने स्वाभिमान,
जिद्द,चिकाटी,धाडसआणि अभ्यासू वृत्ती ठेऊन आपला आणि आपल्या बरोबर समाजाचा देशाच्या प्रगतीत हातभार लावला पाहीजे यासाठी आपल्या माऊलींचा विचार त्यांचे कार्य यांचा प्रसार प्रचार सातत्याने करून त्यांच्या आदर्शप्रमाणे वाटचाल करावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले
संपूर्ण कार्यक्रम हा श्रीम. गुलशन शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .











