जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा विजय निश्चित

उद्योजक विकास शेट्ये यांचा दावा

लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्येही आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच विजय होईल असा ठाम दावा लांजा येथील उद्योजक विकास शेट्ये यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.‌ त्यानंतर लांजा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे.‌ नुकत्याच झालेल्या लांजा नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने घवघवीत यश संपादन केले होते.‌ नगराध्यक्ष पदासह महायुतीचे दहा उमेदवार निवडून आले होते.

या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत महायुतीच्या विजयाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास विकास शेट्ये व्यक्त केला आहे. तळागाळातील जनतेशी असलेला थेट संपर्क, विकास कामांचा भक्कम पाया आणि पारदर्शक प्रशासन यामुळे आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व अधिक बळकट आणि अधोरेखित झाले आहे.‌ आणि म्हणूनच होणाऱ्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत घेतलेले निर्णय आणि संघटनात्मक ताकद यामुळे महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा उद्योजक विकास शेट्ये यांनी केला आहे.

लांजा नगरपंचायतीप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होईल आणि पंचायत समितीचा सभापती देखील महायुतीचाच बसेल असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे