देवरुख करंबेळे येथील सहाणेजवळ रिक्षेवरील ताबा सूटून अपघात;

चालकासह त्याची पत्नी आणि आई जखमी

रत्नागिरी ः प्रतिनिधी
देवरुख करंबेळे येथील सहाणेजवळ रिक्षेवरील ताबा सूटून झालेल्या अपघातात चालकासह त्याची पत्न्ाी आणि आई जखमी झाले. अपघाताची ही घटना गुरुवार 15 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा.सुमारास घडली.
साईप्रसाद महादेव लिंगायत (35) हा त्याच्या ताब्यातील रिक्षेतून त्याची पत्नी सई साईप्रसाद लिंगायत(30) आणि त्याची आई रेश्मा महादेव लिंगायत (55,सर्व रा.शिवणे,संगमेश्वर) यांना घेउन जात होता. तो देवरुख करंबेळे येथील सहाणेजवळ आला असता त्याचा रिक्षेवरील ताबा सूटल्यामुळे रिक्षेचा अपघ्ाात होउन रिक्षेतील तिघेही किरकोळ जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तातडीने प्रथम देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करुन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे.