आचरा पोलीसांची धडक कारवाई, मोटरसायकल चोराच्या चोवीस तासाच्या आत मुसक्या आवळल्या

आचरा पोलीसांची धडक कारवाई

मोटरसायकल चोराच्या चोवीस तासाच्या आत मुसक्या आवळल्या
आचरा–अर्जुन बापर्डेकर
घराच्या बाहेर शेडमध्ये उभी केलेली मोटरसायकल चोरीस जाण्याची घटना मंगळवारी बुधवळे येथे घडली होती. याबाबत विजय शामसुंदर खरात यांनी तक्रार दाखल केल्यावर चोवीस तासाच्या आत आचरा पोलीसांनी धडक कारवाई करत संशयित मोटरसायकल चोराच्या खुडी तालुका देवगड येथून मुसक्या आवळल्या आहेत.

बुधवळे येथील विजय शामसुंदर खरात यांनी घराशेजारी शेडमध्ये उभी केलेली मोटरसायकल अज्ञाताने चोरुन नेण्याची घटना मंगळवार 25 जुलै रोजी बुधवळे येथे घडली होती. याबाबत मंगळवारी सायंकाळी खरात यांनी आचरा पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली होती.
चोरीस गेलेली मोटरसायकल हि फिर्यादी यांनी चोरीस जाण्याच्या काही तासापूर्वीच घटनास्थळी बघितली असल्याने गुन्हा घडून काही कालावधीत झाल्याने गुन्हाची खबर मिळताच लगेचच आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस स्टेशनचे
संदीप कांबळे ,महेश देसाई, अक्षय धेंडे, मिलिंद परब, मनोज पुजारे, महेश जगताप, होमगार्ड योगेश पुजारे
तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.घटनास्थळापासून जवळच असलेल्या पिकनिक पॉईंट कडील लोकांकडे जाऊन गुन्ह्याची चौकशी केली असता एक अनोळखी व्यक्ती साधारणता चोरीस गेलेल्या मोटरसायकल सारखी मोटरसायकल घेऊन तिथून पास झाले असल्याबाबतची माहिती मिळली. सदर माहितीच्या लोकांकडे चौकशी करून सदर व्यक्तीचे वर्णन निष्पन्न केले. सदर वर्णनाचा व्यक्ती खुडी तालुका देवगड या ठिकाणी राहत असल्याबाबत माहिती मिळाली.त्यानुसार बुधवारी सायंकाळी सदर अनोळखी व्यक्तीस गुन्हा घडले पासून 24 तासाच्या आत खुडी तालुका देवगड येथून संशयित गुरुदास आनंत मेस्त्री वय 33 वर्षे यास चोरीस गेलेली मोटरसायकलसह हस्तगत करून ताब्यात घेतले. तक्रार दाखल झाल्यापासून धडक कारवाई करत आचरा पोलीसांनी संशयितास चोवीस तासाच्या आत मोटरसायकल सह ताब्यात घेतल्याने आचरा पोलीसांच्या तत्परते बद्दल कौतुक होत आहे.

फोटो
संशयित मोटरसायकल चोरासह
आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर व इतर