श्रीजा जालगावकर आर्ट्स नवी मुंबई प्रस्तुत ५० कलाकारांचा संच गुहागर वासियांच्या भेटीला
गुहागर श्री व्याडेश्वर महोत्सव २०२६
गुहागर | प्रतिनिधी
श्रीजा जालगावकर आर्ट्स नवी मुंबई प्रस्तुत निर्माता दिग्दर्शक सिद्धेश विलास जालगावकर यांच्यासह ५० कलाकारांचा संच गुहागर वासियांच्या भेटीला येत आहे.
श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर आयोजित महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री व्याडेश्वर महोत्सव २०२६ साजरा करण्यात येत आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी शिवगर्जना व दि. १९ रोजी शिवराज्याभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती दिनांक 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी मोठया उत्साहाने साजरी केली जाते. यावर्षी ३९६ वी शिवजयंती आहे त्यामुळे ती मोठया उत्साहात साजरी होणार आहे. श्रीजा जालगावकर आर्ट्स ही संस्था प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेमार्फत आजपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन आमच्या संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे.
‘शिवगर्जना’ ही महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचे स्मरण करून देते, जी मावळ्यांमध्ये उत्साह व प्रेरणा निर्माण करते. ही घोषणा केवळ घोषणा नसून एक क्रांती आणि युद्धगीत आहे, जी शिवरायांच्या आठवणींना प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात जिवंत ठेवते. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी दि. १८ व १९ रोजी आपल्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवगर्जना हा कार्यक्रम त्याच प्रमाणे शिवराज्याभिषेक हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे तरी गुहागरवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












