कणकवली : कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रिया टेमकर, तालुकाप्रमुख दामू सावंत (जाणवली), जिल्हा परिषद सदस्य रोहिता तांबे, ओसरगाव पंचायत समिती सदस्य अक्षता राणे, कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर, मेहुल धुमाळे, सरिता राऊत आदी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले










