आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मालवणची आमसभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
नागरिकांशी थेट संवाद साधत अडचणी आणि अपेक्षा घेतल्या जाणून
जनतेचे अनेक प्रश्न ऑन दि स्पॉट सोडवले
आमदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीचे उपास्थितानी केले कौतुक
मालवण | प्रतिनिधी : जनता हाच केंद्रबिंदू मानून आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मालवणची आमसभा तब्ब्ल नऊ वर्षांनी मोठया उत्सहात पार पडली. ग्रामस्थांनी मांडलेले अनेक प्रश्न आमदार निलेश राणे यांनी ऑन दि स्पॉट सोडवले. तसेच जनतेने उपस्थित केलेले प्रशासन स्तरावरील प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे. आम्ही जनतेसाठी आणि मतदार संघाच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत. यापुढे आमसभा दरवर्षी होणार असल्याचे ही आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
मागील दहा वर्षात यां मतदार संघात निधीच आला नाही. येथील लोकप्रतिनिधीत निधी आणण्याची धमकच नव्हती. मात्र आम्ही जनतेशी बांधील आहोत. वर्षभरात शेकडो कोटी निधी आला आहे, येत आहे. यापुढीही येत राहील. यां विकासनिधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे. विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पुर्ण झाली पाहिजेत. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आम्ही सर्व शासनाच्या माध्यमातून जनसेवेसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कामाचे विशेष कौतुक आमदार निलेश राणे यांनी यावेळी केले.
मालवण तालुक्याची आमसभा मामा वरेकर नाट्यगृह, मालवण येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या प्रसंगी आमदार निलेश राणे यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून संबंधित सर्व विभागांकडून सविस्तर आढावा घेत, समस्यांचे परिणामकारक निवारण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला.
या आमसभेत मांडण्यात आलेल्या सूचनांवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवत, नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असा विश्वास यावेळी देण्यात आला.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आम सभा सचिव गटविकास अधिकारी शाम चव्हाण, तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, समाजकल्याण सभापती रुहीता तांबे, सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती शाम झाड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिप सदस्य दिपलक्ष्मी पडते, सोनाली घाडीगावकर, सुमेधा पाताडे, वर्षा सांबारी, अक्षता गावडे, क्षमा हडकर, निवेदक चंद्रसेन पाताडे, छोटू कांबळी, शाम वाक्कर, महेश मांजरेकर, संग्राम साळसकर, रवीकिरण तोरसकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध खात्यांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
प्रामुख्याने रस्ता कामातील अनेक ठेकेदार यांच्या बाबत तक्रारी खूप आहेत. खड्डे बुजावणारे काही ठेकेदार कामचुकार आहेत. कामचुकार व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा. त्यांना काळ्या यादीत टाका असे आदेश आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
असे आमदार लाभले हे आमचे भाग्यच!
आमदार साहेब तुम्ही जनतेचा आवाज बनून जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडता व प्राधान्याने सोडवता. मतदार संघात मोठया प्रमाणात विकासनिधी तुम्ही आणला आहात. चांगले काम तुम्ही करतं आहात. तुमच्या सारखे आमदार आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच! अश्या प्रकारे आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव उपास्थित अनेक ग्रामस्थांनी केला.













