जनतेच्या उपस्थित प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
मालवण पंचायत समिती आमसभा
मालवणात शेकडो कोटी विकास निधी आणल्याबद्दल आमदार निलेश राणे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव
मालवण | प्रतिनिधी : वीज विभाग, वन विभाग यांसह अन्य काही विभागा बाबत जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. यां तक्रारीचे निराकरण झाले पाहिजे. लवकरात लवकर जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. जनतेला कोणत्याही समस्या निर्माण होता नये. जनतेशी विनम्रतेने बोला, भाषा सुधारा कामाचा दर्जा चांगला ठेवा. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
तालुक्यात पाहाणी करा जनतेचे प्रश्न जाणून ते सोडवा. आमची बांधिलकी जनतेशी आहे, असे सांगत आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला कर्तव्यपूर्तीची जाणीव करून दिली.
शेकडो कोटी निधी
संतोष साटविलकर, ममता वराडकर, दिपक चव्हाण, संग्राम साळसकर, महेश मांजरेकर, वर्षा सांबारी, देवानंद चिंदरकर, रविकिरण तोरसकर, दादा नाईक यांनी आमदार निलेश राणे यांचे अभिनंदन ठराव मांडले. आठ वर्षे आमसभा झाली नाही. मात्र अभ्यासू व्यक्तिमत्व. कार्यकर्तृत्वाने जनतेचे प्रश्न मांडले मांडत आहेत. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात पुढील 25 वर्षे सुवर्णकाळ ठरेलं असे सांगत संतोष साटविलकर यांनी अभिनंदन ठराव मांडला. मालवण कुडाळच्या सर्वांगीण विकास होत आहे. बंधारा व शहर विकाससाठी कोट्यावधी निधी प्राप्त झाला आहे. होत आहे. वर्षभरात 53 कोटी निधी मालवण शहराला प्राप्त झाला आहे. मालवण शहराचा विकासातून कायापालट होणार. असे सांगत नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी अभिनंदन ठराव मांडला. 29 बेघर कातकरी कुटुंबाना जामीन उपलब्ध करून शासनाच्या माध्यमातून घरे बांधून दिली. विकासकामे होत आहेत. 4 कोटी 95 कोटी मसूरे येथे धूप प्रतिबंधक बंधारा अभिनंदन संग्राम साळसकर. पोईप कृषी मेळावा व घरकुल लाभार्थी. पंतप्रधान आवास योजनेत गत वर्षी 863 लाभार्थी मात्र आपल्या सुचनेनुसार सर्व ठिकाणी सर्वे होऊन 2619 लाभार्थी यावर्षी मंजूर झाले. तोंडवळी धूपप्रतिबंधक बंधारा 13.80 कोटी कामे मंजूर. वर्षा सांबारी अभिनंदन. वायरी, तारकर्ली, देवबाग धूपप्रतिबंधक बंधारा 50 कोटी. देवानंद चिंदरकर. मच्छिमार सेवा सुविधा. कोट्यावधी निधी, मालवण तालुक्यातील विविध भागात मोठया प्रमाणात विकीस निधी. वैयक्तिक सहायता निधी 282 लाभार्थी यांना अनेक वर्षे राखडलेला लाभ मिळवून दिला. विध्यार्थी अपार आयडी जनरेट करणे. मालवण तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. आधार नोंदणीतही राज्यात प्रथम क्रमांक. याबाबत अभिनंदन ठराव मांडला. विकास प्रक्रियेत तालुक्यात शेकडो कोटी निधी आला असल्याचे सांगत सर्वांनी आमदारांचे अभिनंदन केले.
आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली.
२०१७ नंतर आज २०२६ मध्ये 9 वर्षांनी ही सभा होत असल्याचा संदर्भ देत आमदार राणे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला होता. गेली दहा वर्षे मंत्रालयातून निधी मिळवण्यासाठी या मतदारसंघाची साधी नोंदही नव्हती. मात्र, गेल्या वर्षभरात पाठपुरावा करून आपण हक्काचा निधी खेचून आणला आहे. आता हा निधी लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जे अधिकारी काम करणार नाहीत किंवा सभेला अनुपस्थित राहतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील भूमिगत वीज वाहिनी, खोदाई केलेले रस्ते याबाबत अनेक ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे जलजीवनची पाईपलाईन फुटणे आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. १० मे पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
दर्जेदार कामे हेच लक्ष असले पाहिजे, “पोट-कंत्राटदारांच्या भरवशावर कामे सोडू नका, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, मग तो कोणत्याही पक्षाचा असो,” असे आदेश आमदार निलेश राणेंनी दिले. लवकरच ११ उपकेंद्रे कार्यान्वित होतील. आचरा आणि पेंडूर ते कुंभारमाठ दरम्यान सुरू असलेली भूमिगत वीज वाहिन्यांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. भूमिगत वीज वाहिनी कामाबाबत दत्ता सामंत यांनीही तक्रारींचा पाढा वाचला.
समुद्रकिनारपट्टीवर मासळीची लूट करण्यासाठी घुसखोरी करणाऱ्या अवैध एलईडी बोटींवर कठोर कारवाई व्हावी. मोठा दंड, तोडफोड झाली तर पुन्हा यायची हिम्मत होणार नाही. अश्या संतप्त भावना आमदार निलेश राणे अत्यंत आक्रमक पद्धतीने मांडल्या.
दुरसंचारच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करण्याऐवजी जमिनीवर उतरून टॉवर्सचे प्रलंबित प्रश्न सोडवा, सावंतवाडी येथील अधिकाऱ्यांनी एक दिवस कुडाळ, एक दिन मालवण यावे नाहीतर मी सावंतवाडीत येणार
असा इशारा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिला.
पर्यटन व्यावसायिक यांच्या मागणी नुसार जलपर्यटनाचे सर्व अधिकार बंदर विभागाकडे असावेत, या मागणीसाठी मुंबईत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.
परिवहन, वीज, दूरसंचार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मत्स्यविभाग, खारभूमी, बंदर विभाग, पतन विभाग, सामाजिक वनिकारण, कांदळवन, वन विभाग, तालुका कृषी, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य, बांधकाम, जिल्हापरिषद बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन यां सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. जनतेचे प्रश्न जाणून घेण्यात आले. अनुपस्थित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले.
नारीशक्ती विधेयक ला संसदेत विरोधकांनी विरोध केला. महिलांच्या विरोधात देशातील विरोधक आहेत. असे सांगत जिप सदस्यां सुमेधा पाताडे यांनी विरोधकांचा निषेध ठराव मांडला.
मुख्य कार्यकारी अधिकारी व बिडीओ यांचे कौतुक
आमदार निलेश राणे यांनी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर व मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. गटविकास अधिकारी शाम चव्हाण यां महिना अखेर सेवा निवृत्त होत आहेत मात्र त्यांची साथ यापुढेही महत्वाची ठरेलं. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच तालुक्यातील जनतेला व विकास प्रक्रियेत व्हावा. असे गौरवोद्गार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहिर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वासियांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असा हा निर्णय घेतल्या बद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अभिनंदन ठराव मांडला. याला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत अनुमोदन राहिले.













