सिंधुदुर्ग च्या नाट्य चळवळी साठी दिशा देणारी. रंगकर्मी व सदस्य विजय चव्हाण
महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची अत्यंत महत्वाची सभा सिंधुदुर्ग मध्ये कुणकेश्वर येथे गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता अध्यक्ष व सिनेस्टार विजय गोखले यांचे अध्यक्ष ते खाली आयोजित करनेत आली आहे. यावेळी मंडळाचे सचिव संतोष खामकर व अधीक्षक दिलीप वाघमारे उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र च्या कानाकोपऱ्यातील अभ्यासू, दिग्गज नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, अभिनेत्री असे पदमश्री परशुराम खुणे, शिबानी जोशी,सुजाता मराठे, मकरंद पाध्ये, मुकेश गेडाम, मोनिका ठक्कर, अशोक हंडोरे, अनुराग गरुड, पी डी कुलकर्णी, संजय देवळणकर-पाटील, संजय भाकरे, सदानंद बोरकर, जुगलकिशोर ओझा,मुकुंद पटवर्धन, जयंत शेवतेकर, राहुल वैद्य, गुरुनाथ वठारे, दिलीप अलोणे, राजेश गोसावी,इत्यादी सन्मानीय 25 ते 30 सदस्य उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर मराठी व अन्य भाषेतून सादर होणारे सर्व प्रकारचे रंगमंचिय आविष्कार नाटक, एकांकिका, तमाशा, वग, जलसा, इव्हेंट्स,लोकं कला इत्यादी कार्यक्रम सादर होत असतात. महाराष्ट्र आणि मराठीला एक फार प्राचीन सांस्कृतीक अधिष्ठान आहे. त्याचे संस्कारक्षम जतन व जोपासना करणेची जबाबदारी आपली आहे.
या रंगमंचिय आविष्कार साठी अनेक दिग्गज लेखक, नाटककार, रंगकर्मी नवनवीन प्रयोगाद्वारे संहिता लिहीत असतात, आपले विचार मांडत असतात. त्यांची रंगावृत्ती उभी करीत असतात. त्याचे प्रयोगपूर्व परिनिरीक्षण करणेसाठी महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या मातब्बर, जाणकार,दिग्गज रंगकर्मी मधून निवडक वेचिव सदस्य निवडलेले असतात. त्यांच्यावर प्रयोगपूर्व परिनिरीक्षणाची महत्वाची जबाबदारी असतें. शिवाय महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने मराठी रंगभूमीवरील रंगावृत्तीना एक दिशा देणे, सांस्कृतिक चळवळ समृद्ध करणेसाठी धोरण ठरविणे,चुकीच्या रंगावृत्ती सादर होऊ नयेत जेणेकरून सामाजिक, धार्मिक, जातीय एकोपा बिघडेल, संस्कृती आणि संस्कार टिकविले जातील, विकृती जन्मास येणार नाही याची दक्षता घेणे तसेंच शासनाला रंगभूमी सकस करणेबाबत बाबत सल्ला व सहकार्य करणे अशी महत्वाची जबाबदारी या sensor बोर्ड ची असतें.
सिंधुदुर्ग चे सुपुत्र, अभिनेते, लेखक, रंगकर्मी शासनाचे सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुकुंद चव्हाण हे या sensor बोर्डावर गेले तीन वर्ष सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे प्रयत्नातूनच संपूर्ण sensor बोर्ड आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे.
यावेळी सर्व सदस्यांची सकाळच्या सत्रात मिटिंग, दुपारच्या सत्रात सिंधुदुर्ग मधील विविध सांस्कृतीक, धार्मिक, नैसर्गिक, पर्यटन ठिकाणाना भेटी देऊन सिंधुदुर्ग समजून घेणार आहेत.तसेंच समक्ष भेटू इच्छिनाऱ्या जिल्ह्यातील लेखक, रंगकर्मी यांचेशी संवाद साधला जाणार आहे.
सायंकाळी सिंधुदुर्गच्या लोककला कापडखेळे, घुमट वादन, रत्नागिरीचे रंगकर्मी व सदस्य राजेश गोसावी यांचे नमन, जाखडी इत्यादी पारंपरिक सांस्कृतिक ठेवा प्रत्यक्ष सादरीकरणातून अनुभवणार आहेत. ज्यांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्र भर होऊ शकतोय.
या sensor बोर्ड च्या मिटिंग व अन्य बाबींचे स्थानिक आयोजन तसेंच व्यवस्थापन श्री कुणकेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष , व सरपंच /ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कुणकेश्वर हे पाहात आहेत.
तरी या संधीचा फायदा जिल्हातील सर्व नाट्य लेखक, रंगकर्मी, लोकं कलावंत यांनी घ्यावा असे आवाहन बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, सचिव संतोष खामकर, सदस्य विजय चव्हाण यांनी केले आहे.












