धनश्री जोशी यांची कोंडगावमध्ये विजयी मिरवणूक.

ना फटाके ना डीजे लोकांसमोर ठेवला आदर्श

शंकर वैद्य साखरपा:
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील सरपंच पदाच्या विजयी उमेदवार यांची कोंडगाव बाजारपेठेतून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठीक ठिकाणी औक्षण करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू,भगिनी यांचे धनश्री जोशी यांनी आभार मानले . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्याची व आनंदाची लकेर होती. यावेळी साखरपा पत्रकारांच्यावतीने त्यांचा शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी ना फटाके, ना डीजे अगदी शांततेत कोणताही गाजावाजा न करता ही विजयी मिरवणूक काढून सर्वांपुढे आदर्श ठेवला.