दुर्लक्षित आंबोळगड किल्ल्यावर जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून स्वच्छता मोहीम

जैतापूर| वार्ताहर: राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला सुंदर आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आंबोळगड गावातील दुर्लक्षित आणि शासनाकडून उपेक्षित असलेल्या आंबोळगड किल्ल्याची स्वच्छता जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली.
350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दुर्लक्षित आंबोळगड किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
आंबोळगड ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंडळाच्या जवळपास 25 ते 30 कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक 7ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली.
या सर्व सदस्यांचे आंबोळगड सरपंच सौ. साक्षी करगुटकर ,उपसरपंच राजाराम पारकर, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि हॉटेल व्यावसायिक विश्वास करगुटकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वांचे स्वागत केले.
त्यानंतर गडावर गडाची पूजा व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत सर्व सदस्यांनी या किल्ल्याची साफसफाई केली.
या स्वच्छता मोहिमेमध्ये जैतापूरचे लोकनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत, मंडळाचे सल्लागार गिरीश करगुटकर,राजन लाड, अध्यक्ष राकेश दांडेकर, उपाध्यक्ष महेश नारकर, सचिव सुनील करगुटकर, सहसचिव गजानन करमळकर, खजिनदार वासुदेव नारकर, सदस्य श्रीकृष्ण राऊत,अलंकार मयेकर, भर्तृहरी भाटकर ,सिद्धी शिरसेकर, निलेश पालकर, प्रसाद मांजरेकर ,स्वप्निल सोगम, प्रियांका नार्वेकर, प्रकाश नार्वेकर, तेजश्री गिरी ,सिद्धी गिरी, आनंद गिरी नैशदा गिरकर, नरेश गिरकर ,सुहास पवार,गणेश अमरे, आंबोळगडचे उपसरपंच राजाराम पारकर, विश्वास करगुटकर, देवराज करगुटकर आधी सहभागी झाले होते.
आंबोळगड किल्ल्याच्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था परमपूज्य श्री गगनगिरी मठ आंबोळगडचे शामकांत करगुटकर आणि त्यांच्या सर्व सेवेकरी सदस्यांनी केली होती. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे श्री गगनगिरी मठाच्या वतीने शामकांत करगुटकर यांनी तर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच साक्षी करगुटकर ,उपसरपंच राजाराम पारकर आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ विश्वास करगुटकर यांनी आभार व्यक्त केले.
फोटो 8 आरजेपी 4
आंबोळगड किल्याच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेले जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते.