कणकवलीत कॉलेज येथे आयोजन
संतोष राऊळ (कणकवली) १९ ऑगस्ट रोजी कणकवली कॉलेज येथे जिल्हास्तावरील रानभाज्या प्रदर्शन, रानभाज्यांची पाककृती,आणि रानभाजन विषयीची ओळख त्यांच्यातील घटक आणि भाज्या खाल्ल्यामुळे होणारे फायदे याविषयीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लब कणकवली, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ, सिंधुदुर्ग कृषी विभाग आत्मा सिंधुदुर्ग, उमेश संस्था सिंधुदुर्ग आणि कणकवली कॉलेजच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. १९ ऑगस्ट रोजी १.३० वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉलमध्ये हे प्रदर्शन होणार आहे. अशी माहिती या संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली कॉलेज येथे जिल्हास्तरीय रानभाज्या पाककृती स्पर्धा आणि प्रदर्शन याविषयी पत्रकार परिषद झाली. यावेळी कणकवली कॉलेजच्या चेअरमन डॉक्टर राजश्री साळुंखे, कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर युवराज महालिंगे, रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉक्टर विद्याधर तायशेटे, स्नेहसंमेलचे पदाधिकारी हेमंत सावंत, पंकज दळी,आत्मा विभागाचे विनायक पाटील, उमेद आभियानची अमृता चव्हाण,संतोष कांबळी,प्रा.डॉ. बी.जी. गावडे, गीतांजली सापळे,आदी उपस्थित होते.
रानभाज्या चे खादय पदार्थ करताना रान भाजी स्वरूपात हवे,त्याची पारंपारिक पद्धत, केलेल्या त्या भाजीत असावी.वेगळ्या वेगळ्या प्रकारची पाककृती करतांना त्या भाजीचा गुणधर्म आणि मूळ चव जाता नये.असे आवाहन करण्यात आले आहे.भाजीचे गुणधर्म टिकून राहण्यासाठी यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.असे डॉ. प्रा. बाळकृष्ण गावडे यांनी सांगितले.
ज्यांना या स्पर्धेत भाग घ्याय चा आहे त्यांनी अधिक माहिती साठी 91 94212 67340 या फोन नंबर वर संपर्क करावा किंवा आयोजक संस्थांकडे नावे द्यावीत. कार्यक्रम स्थळी स्थेट येणाऱ्या स्पर्धकांना सुद्धा प्रवेश दिला जाणार आहे.
या वेळी व्याख्यान दिले जाणार आहे.त्यासाठी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ.बी.जी.गावडे, डॉ. निलेश कोदे हे रानभाज्या, त्याचे महत्व सांगणार आहेत.
या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी,,जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांतअधिकारी, उपस्थित राहणार आहेत.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कणकवली कॉलेजच्या आय.क्यू. ए. सी. व सायन्स शाखेचे सहकार्य आणि सहभाग राहणार आहे.












