देवरूख : देवरूख येथील सोळजाई मंदिराजवळ राहणाऱ्या मंगेश रघुनाथ शेट्ये यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या विहिरीत दि.२५, शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले होते .
ही घटना समजताच नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
मंगेश शेट्ये यांच्या घराचे मागील बाजूस विहिरीमध्ये बिबट्या पडल्या असल्याचे खबर श्री.मंगेश रघुनाथ शेट्ये यांनी वनपाल संगमेश्वर(देवरुख) तौफिक मुल्ला यांना कळविले.
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्याच्या सहाय्याने बाहेर सुखरूपपणे काढले . या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व स्वयंसेवी संस्थाना पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने विहिरीमध्ये पिंजरा सोडल्या बरोबर ११.५० च्या दरम्यान लगेच बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित आला. हा बिबट्या हा साधारण अडीच वर्षाचा असुन तो नर आहे.
बिबट्याला विहिरीबाहेर काढताना बघण्यासाठी नागरिकांंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भक्षाचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. पशुसंवर्धन अधिकारी देवरुख यांच्या कडून वैद्यकीय तपासणी करून घेतली असता वन्यप्राण्यांस तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.तहसीलदार संगमेश्वर अमृता साबळे यांनी बिबट्याची पाहणी केली. त्या नंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
यावेळी प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी , तौफिक मुल्ला वनपाल संगमेश्वर(देवरुख) वनरक्षक सहयोग कराडे, आर.डी.पाटील, आकाश कडूकर, सुरज तेली, रणजित पाटील, पोलीस विभागाचे पोलीस नाईक जाधव, महिला कॉन्स्टेबल कांगने तसेच प्रतिक मोरे वन्यजीव अभ्यासक देवरुख व रेस्कु टीम देवरुखचे दिलीप गुरव, संतोष कदम, अनिकेत मोरे, राजु गायकवाड, अण्णा बेर्डे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते .अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे.












