ओटवणे(प्रतिनीधी) प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन – मुंबई च्या शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या फोन – इन कार्यक्रमासाठी शाळा माडखोल नं . २ , धवडकी या शाळेचा इयत्ता सहावी चा गुणवंत विद्यार्थी कु . जयजनार्दन कोंडू बरागडे याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नागपूर आकाशवाणीवर निवड झाली आहे .हा कार्यक्रम आकाशवाणीवरून ७ सप्टेंबर २०२३ रोजी स. १० : ३० वा . प्रसारीत होणार आहे . जय च्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मा . श्रीम . भावना गावडे मॅडम , शा. व्य . स . अध्यक्ष मा . श्री . उदय राऊत , शालेय कमिट्या – पालक – ग्रामस्थ – शिक्षकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे . याकामी प्रथम एज्युकेशनच्या कोकण समन्वयक मा . श्रीम. ऋतुजाताई पाटील मॅडम यांचाही मोठा वाटा असून या उपक्रमासाठी त्यांचें शाळेला ही मोठे सहकार्य लाभले आहे. या विद्यार्थ्याच्या यशात मार्गदर्शक शिक्षक अरविंद सरनोबत सरांसह समिक्षा रावुळ मॅडम, वैदेही सावंत, केशव जाधव या शिक्षकांचे ही मोठे योगदान आहे.शिक्षकांकडून जय जनार्दन या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छा ही देण्यात येत आहेत.












