वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिरोडा गावचे माजी सरपंच, शिरोडा वरचीकेरवाडा येथील रहिवासी, ज्येष्ठ मच्छीमार नेते आणि केरवाडा श्री.माऊली मंदिराचे विश्वस्त शिवा काशिनाथ नाईक ऊर्फ बाबा नाईक (वय ७२) यांचे आज मंगळवार १७ मार्च रोजी दुपारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, वाहिनी, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
समाजाच्या समस्या सोडविण्या बरोबर गावातील विकासात्मक कामातही ते नेहमी पुढे असायचे.











