रत्नागिरी : कुवारबाव,मिरजोळे व परीसरातील सर्व व्यापाऱ्यांची सभा आर के फर्निचर कुवारबाव येथे संपन्न झाली.या सभेला सुमारे १२५ व्यापारी उपस्थित होते.कुवारबाव बाजारपेठेत अनेक खेड्या-पाड्यातून ग्राहक या ठीकाणी विविध वस्तु खरेदिसाठी येत असल्यामुळे महत्व प्राप्त झाले आहे. असे असताना कुवारबाव,मिरजोळे,गयाळवाडी,खेडशी व परीसरातून रत्नागिरी -नागपुर राष्ट्रीय मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे.बहुसंख्ये व्यापारी व लगतचे जमिन मालक बाधित होत आहेत यामुळे त्यांचे इतरत्र स्थलांतर तर काही पुर्णतः उध्वस्त होणार असल्याची भिती उपस्थिती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.बाधित व विस्थापित होणाऱ्या व्यापाऱ्यांचे पुर्नवसन करण्यासाठी व्यापारी संघटना प्रयत्नशील आहेत.राष्ट्रीय महामार्गा लगत ज्या जमिन मालकांच्या जागा शिल्लक आहेत त्याठीकाणी शासकीय अटी-शर्ती पुर्ण करुन नवीन व्यापारी गाळे अस्तीत्वात येतील त्यावेळी या भागातील बाधित व विस्थापीत व्यापारी आहेत त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा असे व्यापारी संघटनेकडून आवाहन करण्यात आले आहे.ऐवढेच नव्हेतर कुवारबाव ,मिरजोळे या भागात पुनश्च निर्माण होणारी बाजार पेठ ही स्वच्छ व आदर्श बाजार पेठ बनविण्याचा संघटनेचा प्रयत्न राहाणार आहे.
व्यासपीठावर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.निलेश लाड,कार्याध्यक्ष श्री.हितेंद्र पटेल,उपाध्यक्ष श्री.राजेश तोडणकर,श्री.प्रशांत कोपर्डे,सचिव श्री.प्रभाकर खानविलकर,कोषाध्यक्ष श्री.दर्शन पवार उपस्थित होते.
बँक ऑफ इंडिया शाखा एमआयडीसी शाखाधिकारी श्री.गुप्ता साहेब यांनी बँकेतील विविध योजना व कर्जपुरवठा याबाबत सखोल माहिती दिली त्याचप्रमाणे जे व्यापारी राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित होणार आहेत त्याना नवीन व्यापार किंवा उद्योग सुरू करण्यासाठी बँक ऑफ इंडियाची ही शाखा सर्वोतोपरी सहकार्य करील असे सांगितले यावेळी शाखेतील कर्मचारी श्रीम.शिवलकर मॅडम ही उपस्थित होत्या.
पाटबंधारे कमान ते रेल्वेस्टेशन पर्यंतचा सोळा पिलरचा उड्डाण पूल होणार असल्याचे समजते.तसा प्रस्ताव मुंबईला गेला आहे हा प्रस्ताव लवकर मंजुर होवून कामाला सुरुवात व्हावी.त्याचप्रमाणे काही जमिन मालकांचा जमिनिचा मोबदला मिळालेला नाही यासाठी संघटनेमार्फत पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.सुव्यवस्थित व न्यू रत्नागिरी होण्यासाठी सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.यासंदर्भात श्री.संजीव विचारे,श्री.स्वप्नील सुर्वे ,श्री.वसंत लोंढे यांनी व्यापाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मते व्यक्त केली.
राष्ट्रीय महामार्गाचे व उड्डाण पुलाचे काम जलद गतीने होण्यासाठी ठेकेदार व सबंधीत अधिकारी वर्गाला सहकार्य करण्याची भूमिका असेल. उड्डाण पूलाखाली बाहेर व्यापारी बिगरपरवाना व अनधिकृत व्यवसाय करणार नाहीत याची संघटनात्मक दक्षता घेण्याचे ठरविण्यात आले आहे कारण असे व्यवसाईक कचरा टाकून अस्वच्छता करता याकडे स्थानिक व्यापाऱ्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.हि सर्वसाधारण सभेचे व्यवस्थापण करण्यासाठी श्री.रोहन मयेकर,श्री.कडू,श्री.राजेंद्र कवितके,श्री.महेश भिंगार्डे ,श्री.निलेश चव्हाण,श्री.सुनिल पुर्बिया यांनी मेहनत घेतली.









