बांदा (प्रतिनिधी) : डेगवे येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सव दरम्यान १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १५ रोजी घटस्थापना होईल. सायंकाळी ४ वाजता मोरगाव येथील महिलांची फुगडी, ६ वा. खालची मोयझरवाडी – वराडकरवाडीचे भजन व ९ वा. नारिंग्रे देवगड येथील कु. आरती बापट हीचे कीर्तन होईल.
सोमवार १६ रोजी रात्री ८.३० वाजता जांभळवाडी ग्रामस्थांचे भजन व ९ वा. चेंदवणकर गोरे दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. मंगळवार १७ रोजी रात्री ८.३० वा. फणसवाडी मंडळाचे भजन, ९ वा. परमपूज्य श्री नामदेव महाराज भजन मंडळ आंदुर्ले बुवा आनंद मोर्ये यांचे कार्यक्रम होतील.
बुधवार १८ रोजी रात्री ८.३० वा. जांभळवाडी मंडळाचे भजन, ९ वा. श्री रायकर भजन मंडळ बुवा उदय मेस्त्री व श्री सावंतवस भजन मंडळ बुवा वैभव राणे यांचे भजन होईल. गुरुवार १९ रोजी रात्री ८.३० वा. माजगाव मंडळाचे भजन व ९.३० वा. आंबेखणवाडी मंडळाचे भजन होईल. शुक्रवार २० रोजी रात्री ८.३० वा. आंबेखणवाडी मंडळाचे भजन व ९.३० वा. श्री देव गंगोबा दशावतार नाट्यमंडळ ओवळीये यांचा नाट्यप्रयोग होईल.
शनिवार २१ रोजी ६ वा. बाजारवाडी – खालची फणसवाडी मंडळाचे भजन, ८.३० वा. हंसापूर येथील घुमट भजन होईल. रविवार २२ रोजी दुपारी ३.३० वा. स्थानिक महिलांची फुगडी, ६.३० वा. मोयझरवाडी मंडळाचे भजन, ८.३० वा. भजनी बुवा संजय गावडे व बुवा दीपक खरुडे यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगेल.
सोमवार २३ रोजी सकाळी होमहवन, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ३ वा. ओटी भरण्याचा कार्यक्रम, ८.३० वा. माणगाव येथील हभप ऋचा संजय पिळणकर यांचे कीर्तन होईल. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. दररोज रात्री ८ वाजता आरती होईल. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान कमिटीच्या व्यवस्थापक मंडळातर्फे करण्यात आले आहे.












