वेंगुर्ला : दाजी नाईक : हिदू संस्कृतीमधील स्त्रीचे स्थान हे उच्च दर्जाचे असून आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सामाजिक पिढी घडवण्याचे कार्य महिला करत असतात. अशा कर्तृत्ववान महिलांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी सन्मान केला जातो. ज्या महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये लक्षवेधी काम केले आहे अशा नऊ महिलांचा सन्मान दस-याच्या शुभमुहूर्तावर ‘रणरागिणी पुरस्कार‘ देऊन वेंगुर्ला येथील भाजप कार्यालयात महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. यात अनाथ बालके व महिला सक्षमीकरण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या सविता विश्वनाथ कांबळी (वायंगणी), पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणा-या खर्डेकर महाविद्यालय वनस्पती शास्त्र विभागप्रमुख डॉ.डी.एस.पाटील (वेंगुर्ला), सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या सुजाता पडवळ (तुळस), आशा स्वयंसेविका म्हणून उत्कृष्ट कार्य करणा-या वर्षा परब, यंत्र दुरुस्ती सारखा वेगळा मार्ग अवलंबून स्वतः रोजगार निर्मिती करून बेरोजगारांना एक प्रेरणा देणा-या येथील करिष्मा सोनसुरकर (वजराट), काळाच्या आड होत चाललेल्या हातमाग सारख्या व्यवसायिक कलेचे जतन आणि संवर्धन करून रोजगारासाठी कौटुंबिक हातभार लावणा-या शुभांगी सुधाकर सावंत-भोसले (वजराट), बचत गटासाठी कार्य करणा-या व योग प्रचार प्रसार करणा-या उर्वी उदय गावडे (रामघाट), कॅटरिग व्यवसायातून व्यावसायिक संधी साध्य करणा-या आणि मंगल कार्यालय चालवणा-या पल्लवी राजेश गावडे (अणसूर), मानसिक आरोग्यावर कार्य करणा-या सहज ट्रस्टच्या अध्यक्ष मीनाक्षी अळवणी या महिलांचा समावेश आहे.
यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, पपू परब, सारिका काळसेकर, प्रार्थना हळदणकर, शितल आंगचेकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, वृंदा गवंडळकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, सुजाता देसाई, वृंदा मोर्डेकर, रसिका मठकर, सोनीया मठकर, कावेरी गावडे, स्नेहल पालकर, प्रणाली खानोलकर, कार्तिकी पवार, स्वरा देसाई, अंकिता देसाई, श्रद्धा धुरी, ज्ञानेश्वर गावडे, पूजा तोरसकर, मनवेल फर्नांडीस, कमलेश गावडे, सुभाष खानोलकर, सुनिल घाग, वामन भोसले, सुनिल मठकर आदी उपस्थित होते. वेंगुर्ला भाजपाच्यावतीने अॅड. सुषमा खानोलकर यांच्या हस्ते श्वेता कोरगांवकर यांचा सत्कार करण्यात आला.












