कणकवली : पोदार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली मधील पोदार प्रेप येथे मोठ्या जल्लोषात छोट्या खेळाडूंनी विविध स्पर्धेत भाग घेत क्रीडा दिन साजरा केला.नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजी च्या मुलांची अगदी सुबकतेने परेड, टॉर्च पासिंग आणि कवायती नृत्य प्रदर्शन करीत या कार्यक्रमाची दणक्यात सुरुवात केली.प्रत्येक वर्गाच्या विविध पद्धतीच्या शर्यथ आयोजित करून मुलांच्या आत्मविश्वासात आणखी भर पाडण्यात आली.आजी आजोबांची हसा चला शर्यथ, पालकांची हुलहुप शर्यथ असे मजेशीर खेळ करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती कणसे आणि प्राध्यापिका सौ. शकुंतला तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला.












