खेड (प्रतिनिधी)खेड शहरासह भरणे परिसरात बेकायदेशीरंपणे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यांवर येथील पोलिसांनी धाडसत्र सुरू ठेवल्यानंतर मटका जुगार अड्डे बंद झाले होते. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतरही पुन्हा मटका जुगार अड्डे तेजीत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. भरणे परिसरातही मटका जुगार व्यावसायिकांच्या ‘चिमणी पाखरांचा संचार कायमच आहे. यापार्श्वभूमीवर येथील पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडेच नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.
परिसरातील मटके जुगार अड्डे देखील बंद होते. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, मटका जुगार व्यावसायिकांनी पुन्हा ‘किलबिलाट करण्याची जय्यत तयारी करत मटका जुगार अड्डे सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राजरोसपसणे मटका जुगार व्यवसाय सुरू ठेवणाऱ्याव्यावसायिकांना नेमका वरदहस्त कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.












