ऑलिम्पियाड परीक्षेत २८ जणांना सुवर्णपदक

खेड (प्रतिनिधी) विज्ञान ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलमधील (सीबीएसई) २८ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. ७ विद्यार्थ्यांची द्वितीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे.

शाश्वत ओकटे, श्रद्धा कसुकर, समर्थ शिरगावकर, सई पाटील, एकांश दळवी, राज धुमाळ, पार्थ मनवळ या विद्यार्थ्यांची द्वितीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये इ. १लीतील भूमी शिर्के, श्रीअंश पवार, रिद्धी मोरे, २रीतील रिशक आंब्रे, किपाल कांबळे, अद्वैत तळेकर, ३रीतील शौर्य भेंडे, शिवतेज करळे, ४थीतील जुई शिर्के, मोहम्मद भाक्क्षे यांचा समावेश आहे.

इ. ५वीतील भार्गव कदम, श्रेयसी इब्राहमपुरकर, ६वीतील अदि मालकर, सार्थ जंगम, ७वीती श्रेया शिंदे, वेदश्री थरवळ, ८वीती धनोज पाटील, ९वीतील वेदां गोरे, अथर्व शेलार, १०वीती मनिष पाटील, ऋग्वेद बहुतुले यांच समावेश आहे. विद्यार्थ्यांना इंग्रज विषय शिक्षक प्रेरणा वाघमा शर्वरी शिर्के, विधी भोसले, मंदा भोसले, प्रवीण कांबळे यांच मार्गदर्शन लाभले. प्राचार्य भर मोरे यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच सत्कार करण्यात आला.