खेड(प्रतिनिधी)ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड,(रत्नागिरी) संचालित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी पंचायत समिती खेड (शिक्षण विभाग) व यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणंद, खेड, (रत्नागिरी) या ठिकाणी आयोजित ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ३ रा क्रमांक प्राप्त केला
इयत्ता ७वी तील अभेद्य सुनील देशमाने व यश तुषार धुलप यांनी वैज्ञानिक प्रतिकृती मध्ये प्राथमिक गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला. इ. ९ वी तील कु.मनिष सागर पाटील व कु.आदित राहुल प्रभू यांनी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच इ. ९ वी तील कु. दृष्टी दीपक खांबे हिने विज्ञान निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
सदर विद्यार्थ्यांना प्रतिकृती बनविण्यासाठी इयत्ता ९वी तील अनुष्का पाटील, शिरीन सुरा व सिद्धी जगताप या विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले. विज्ञान शिक्षक श्री.मनोज सुतार, सौ.श्रद्धा निकम, सौ. पुनम आंब्रे, श्री. प्रभात भोसले, श्री. किरण दरेकर श्री. प्रलय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलचे प्राचार्य श्री. भरत मोरे तसेच इंग्लिश मीडिअम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.











