विज्ञान सृजन 2023

राजापूर हायस्कूल आणि गोडे दाते कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान सृजन 2023 स्पर्धा संपन्न.
वैज्ञानिक संकल्पना सोप्या आणि रंजक व्हाव्यात या उद्देशाने वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित शैक्षणिक साधन निर्मिती आणि सादरीकरणाच्या या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील 20 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते चांद्रयान प्रतिकृतीचे प्रक्षेपण करून करण्यात आले.

स्पर्धकांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मदतीने उत्तमोत्तम मांडणी केली यातून श्री.सत्यनारायण देसाई,श्री.निलेश मालवणकर आणि श्री.महेश हळदवणेकर यांच्या परीक्षण मंडळाने परीक्षण करून प्रथम – नूतन विद्यामंदिर ओणी,द्वितीय – निर्मला भिडे जनता विद्यालय कोंड्ये,तृतीय – उत्कर्ष विद्यामंदिर शिवणे खुर्द उत्तेजनार्थ – ज्ञानविकास सहकारी हायस्कूल भालावली आणि उमाताई शरद परुळेकर विद्यालय,वडवली या संघाना पारितोषिके देण्यात आली.

यासोबतच सादरीकरणासाठी इतर बक्षिसे देखील देण्यात आली.
अकरावी विज्ञान या वर्गाच्या वतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अभिजित घागरे,श्री.दत्तप्रसाद सिनकर,श्री.सुयोग तांबे,श्री.गिरीश भातडे,श्रीमती समृद्धी बावधनकर यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला राजापुर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्री.प्रकाश भावे,कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी,उपाध्यक्ष श्री अभय मेळेकर,कार्यवाह श्री.जगदीश पवार,मुख्याध्यापक श्री.जगदीश भालशंकर तसेच इतर संस्था सदस्य यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.