एकाला वाचवण्यात यश, एक अजूनही बेपत्ता
देवगड: देवगड समुद्रात बुडालेल्या सहा जणांपैकी चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर एकजण वाचला आहे.
प्रेरणा डोंगरे,अंकिता गालटे,अनिषा पवळ,पायल बनसोडे अशी चारही मृत झालेल्या व्यक्तींची नावे असून वाचवण्यात यश आलेल्याचे आकाश तुपे असे नाव आहे.तर राम डिचवलकर हा अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा – देवगड समुद्रात बुडालेल्या सहापैकी चार जणांचे मृतदेह सापडले
सविस्तर बातमी | देवगड समुद्रात बुडालेल्या एकाचा अद्याप शोध सुरू, चार विद्यार्थिनींचे मृतदेह सापडले
पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली असताना देवगड समुद्रात आनंद लुण्यासाठी हे सर्व उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.वरील सर्व 06 मुले ही 18 ते 24 वर्षे या वयोगटातील आहेत.
Video | देवगड समुद्रात सहा जण बुडाले












