Appeal regarding hostel building on lease of Social Justice Department
रत्नागिरी दि.07:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत ७५ विद्यार्थी क्षमता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह चिपळूण या वसतीगृहासाठी चिपळूण शहरात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह रत्नागिरी, या वसतीगृहासाठी रत्नागिरी शहरात आवश्यक सर्व सोयी सुविधांची पुर्तता करणारी इमारत भाडे तत्वावर हवी आहे. तरी इच्छुक इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी, सामाजिक न्याय भवन, कुवारबाव रत्नागिरी या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह जेलरोड, रत्नागिरी मो.नं. ९८८१०४४०१८, गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह खेर्डी, चिपळूण मो.नं. ८००७३४१२००, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रत्नागिरी कार्यालय मो.नं.८८०६३६८५७२ या भ्रमणध्वनीवर तात्काळ संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांनी कळविले आहे.











