दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील नवानगर परिसरात रहाणा-या रमेश दुर्गाप्पा देवकर या पन्नास वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना १४ घडली आहे.
या बाबत दापोली पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी पाच च्या दरम्यान घराजवळील जंगलमय परिसरात दारूच्या नशेत काजूच्या झाडाला लटकून नायलन दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही .पोलीस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









