खेड पोलीसांच्या विशेष पथकाद्वारे “अमली पदार्थाची विक्री” करणाऱ्या दोन इसमांना अटक.

खेड | प्रतिनिधी :रत्नागिरी जिल्ह्यात, मागील काही दिवसात, काही इसम अमली पदार्थाची खरेदी व विक्री करत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. या अनुषंगाने, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा यांना याबाबत कारवाई करणेबाबत सूचना दिल्या होत्या.

या अनुषंगाने उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पोलीस पथक गठित करण्यात आले.

दिनांक 20/12/2023 रोजी, या विशेष पोलीस पथकाला बातमीदारा मार्फत एक खात्रीशीर बातमी मिळाली की, दोन इसम गांजाचा साठा घेऊन खास ग्राहकांना विक्री करण्यासाठी खेड येथे येणार आहेत.

मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने दिनांक 20/12/2023 रोजी 14.33 वा च्या दरम्याने या पथकाने खेड येथील सरस्वती मंदिराच्या शेजारी, कशेडी घाटातील रस्त्यावर एका विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून मुंबईकडून खेडच्या दिशेने येणाऱ्या एका पुरूष व महिलेस संशयित रित्या जाताना थांबविले व त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता तसेच त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता मोटर सायकल वरील बसलेल्या महिलेच्या बॅगमध्ये एकूण 3 किलो 758 ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा हा अमली पदार्थ तसेच पॅकिंग करण्याचे साहित्य मिळून आले.

या दोन्ही इसमांची चौकशी करण्यात आली व या चौकशी दरम्याने त्याने आपले नाव, लक्ष्मण कुदंन भोरे, ३९ वर्षे, मुळ रा. माझगावकर माळ झोपडपट्टी ता. जि. सातारा सध्या रा. आझाद चौक, लक्ष्मी नगर ता. कोरेगाव जि. सातारा असे सांगीतले.

या दोन्ही इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच त्यांच्या अंगझडती मधून मिळून आलेला गांजा हा अमली पदार्थ, ₹ 1,25,000 किमतीची एक मोटर सायकल, ₹10,000 किमतीचा 1 मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. या दोघांविरूद्ध खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८०/२०२३ अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम-१९८५ चे कलम ८(क), २०(ब) २ (ब), २२ (ब) तसेच भा.द.वि.सं. चे कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीत यांना दिनांक २०/१२/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई, खेड पोलीस ठाण्यातील विशेष पथकामधील खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

1) पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोयर, खेड पोलीस ठाणे,

2) सपोनि, श्री. संजय चव्हाण, खेड पोलीस ठाणे,

3) पोऊनि, श्री. हर्षद हिंगे, खेड पोलीस ठाणे,

4) पोऊनि, श्री. सुजित सोनावणे, खेड पोलीस ठाणे,

5) म.पोहवा/८० श्रीमती. अस्मिता साळवी,

6) पोकॉ/८१५ श्री. रोहीत जोयशी,

7) पोकॉ/९६२ श्री. वैभव ओहोळ,

8) पोकॉ /८२३ श्री. राहुल कोरे,

9) पोकॉ /६६ श्री. कृष्णा बांगर व

10) पोकॉ/१२९४ श्री. प्रकाश पवार.